वार्षिक सर्वसाधारण सभा २०२४

श्री देवांग कोष्टी समाज चौंडेश्वरी मंदिर, कोल्हापूर

(नॉ.क्र.ए-१४१) २१९४, बी वॉर्ड, मंडलिक गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर, आणि

श्री देवांग कोष्टी समाज बोर्डिंग, कोल्हापूर (मॉ.क्र.ए-३) २१७४, ए वॉर्ड, गंगावेश, पाडळकर मार्केट, कोल्हापूर.

या दोन्ही संस्थांची

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

वरील दोन्ही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २८ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ठिक ६.३० वा. श्री देवांग कोष्टी समाज चौंडेश्वरी मंदिर, मंगळवार पेठ, कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केली आहे. कृपया सर्व सभासदांनी वेळेवर हजर रहावे, ही विनंती.

सभेपुढील विषय

१. मागील सभा दि. ३० जुलै २०२३ इ. रोजीचा सभा वृतांत वाचून कायम करणे.

२. सन २०२३-२४ सालचा वार्षिक अहवाल व अंतर्गत लेखापरीक्षकांनी प्रमाणित केलेली ताळेबंदपत्रक मंजुर करणे.

३. सन २०२३-२४ सालासाठी दिलेल्या मानधनास मंजुरी देणे.

४. सन २०२३-२४ चे अंदाजपत्रकाप्रमाणे वाढीव खर्चास मंजुरी देणे व सन २०२४-२५ सालासाठी कार्यकारणीने शिफारस केलेले अंदाजपत्रक मंजुर करणे.

५. संस्थेच्या प्रस्ताविक सुधारीत घटनेस मंजुरी देणेबाबत.

६. मा. अध्यक्ष महोदय यांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या कामांचा विचार विनिमय करणे. मा. संचालक मंडळाचे आदेशानुसार.

दि. ५ जुलै २०२४

आपले विश्वासू

राजेंद्र खंडेराव ढवळे ,अध्यक्ष

राम गोपाळराव मकोटे उपाध्यक्ष, मंदिर

गजानन विनायक समंग ,सेक्रेटरी

मोहन रामचंद्र हजारे उपाध्यक्ष, बोर्डिंग

विशेष सुचना व टीप :

१. कोरम अभावी सभा तहकूब झाल्यास १ तासासाठी सभा तहकूब करान सभा वर नमूद केलेल्या ठिकाणीच व त्या दिवशीच घेतली जाईल.

२. कृपया सभेस येताना अहवाल सोबत आणावा.

 

३. अहवाल, ताळेबंद संबंधी काही प्रश्न विचारावयाचे असतील तर दि. २५ जुलै २०२४ पर्यंत संस्थेच्या कार्यालयामध्ये पोहोचतील अशा बेताने लेखी स्वरुपात पाठवावेत.