भव्य राज्यव्यापी युवा संमेलन
श्री देवांग कोष्टी समाज मंदिर व बोर्डिंग, कोल्हापूर या दोन या कोल्हापूरातील कोष्टी समाजाच्या मातृसंस्था आहेत. याच्याच अंतर्गत कोष्टी समाज युवा संघटना, महिला मडळ, कोल्हापूर कार्यरत आहेत. मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे समाजाची भव्य इमारत आहे. कोल्हापूरात देवांग कोष्टी समाजाची सुमारे ३०० घरे असून समाजाची जवळ जवळ २५०० लोकसंख्या आहे. प्रामुख्याने नोकरी व व्यवसाय यामध्ये लोक असून येथील समाज शेती व विणकर व्यवसायाशी फारसा संबंधित नाही, पण ४० वर्षापूर्वी येथील बांधव विणकर व्यवसाय करीत होते. कष्टाळू व एकीच्या भावनेने समाजातील लोक राहतात. महाराष्ट्रातील प्रमुख कोष्टी समाजातील संस्थेतील मान्यवर पदाधिकारी आहेत. यामध्ये प्रामुख्याने अखिल महाराष्ट्र कोष्टी समाजाच्या सेवा मंडळाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून श्री. बळीराम कवडे काम पाहतात. तसेच अखिल महाराष्ट्र कोष्टी परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी श्री राजेंद्र ढवळे हे काम पहात असून श्री नामदेवराव रोड, श्री. सुरेश कवडे, श्री. बाबूराव ढवळे, ही मंडळी राज्य कार्यकारणीत काम पाहतात.11:44 PM